23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडविकासासाठी पन्नास लोकांनी क्रांती केली

विकासासाठी पन्नास लोकांनी क्रांती केली

एकमत ऑनलाईन

नांदेड : सत्तेत असताना आमदारांना मतदारसंघात काम करता येत नव्हती, नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा देता येत नव्हत्या. त्यामुळे आपापल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणायची असेल तर मोठी क्रांती घडवणे आवश्यक होती आणि ती आम्ही पन्नास लोकांनी घडवून दाखवली असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामाच्या भूमिपूजनासह कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे कौतूक करताना म्हणाले की, नांदेडच्या लोकांनी अतिशय नम्र, लोकाभिमुख, न्याय देणारा, मतदारांची काळजी घेणारा लोकप्रतिनिधी म्हणून कल्याणकर यांची निवड केली ही चांगली गोष्ट आहे. यापुढे कल्याणकर यांच्या मतदारसंघात काहीही कमी पडू देणार नाही. ते आता हक्काने काम सांगु शकतात, मतदारसंघाला न्याय देण्यासाठी तसेच त्यांना पाठबळ देण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचेही ठामपणे सांगीतले. या मेळाव्यास माजी मंत्री संजय राठोड, खा. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर यांच्यासह मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसैनिकांवर अन्याय झाला : शिंदे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अनेक आमदारांना पुर्वीच्या सरकारमध्ये काम करताना अडचणी येत होत्या. पाहीजे तसे काम करता येत नव्हते, शिवसैनिकांवर अन्याय आणि खच्चीकरण होत होते. त्यामुळे काहीतरी वेगळी क्रांती करण्याची गरज होती आणि ती आम्ही पन्नास लोकांनी करून दाखविली. मला अभिमान आहे की, आम्ही जी क्रांती घडवली, ऐतिहासिक घटना घडविली. या गोष्टीची नोंद राज्याने, देशानेच नाही तर संपूर्ण जगाने घेतली असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या