मुंबई : वडील आणि मुलीने एक फायटर जेट विमान उडविले असून ही वायुसेनेच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे. एअर कमांडर संजय शर्मा यांनी आपली मुलगी अनन्या शर्मासोबत फायटर जेट उडविले. भारतीय वायूसेनेत अशी घटना पहिल्यांदा घडली. फायटर जेट वडील व मुलीनं सोबत उडविलं. वायुसेनेच्या इतिहासात असा क्षण पहिल्यांदा आला.
वायूसेनेत उड्डाण करणारी वडील व मुलीची ही पहिली जोडी ठरली. फ्लाईंग ऑफिसर अनन्याने भारतीय वायू सेना स्टेशन बीदरमध्ये हॉक -१३२ विमानाचे इनफार्मेशन उड्डाण भरली. याठिकाणी अनन्या लढावू विमानात पदवी) प्राप्त करण्यापूर्वी प्रशिक्षण घेत होती. वायूसेनेत असा प्रसंग यापूर्वी कधी आला नव्हता. फायटर जेट विमान वडील व मुलीने चालविले.
इंटरनेटवर हा फोटो व्हायरल झाला. ज्यात वडील व मुलीने मिळून विमानाचे उड्डाण भरले. एअर कमांडर संजय शर्मा आणि मुलगी अनन्या शर्मा यांनी कर्नाटकाच्या बिदार येथे हॉक -१३२ विमानाचे उड्डाण भरले. ही घटना ३० मे रोजी घडली. आयएएफनं प्रेस रिलीज केली. त्यानुसार, वडील आणि मुलीनं सोबत विमान उड्डाण पहिल्यांदा केल्याचं सांगितलंय. फोटोत एअर कमांडर शर्मा आणि त्यांच्या मुलीचं छायाचित्र विमानासमोर आहेत. त्या विमानाचं उड्डाण भरण्यासाठी ते सज्ज असल्याचे दिसत आहे.