24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रअमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा

अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा

एकमत ऑनलाईन

परळी : धर्मद्रोही असलेल्या अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी हिंदूधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे. परळी-वैजनाथ येथील पोलिस ठाण्यात आंदोलकांनी ठिय्या धरला आहे. जोपर्यंत मिटकरींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत येथून उठणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
परळीतील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढण्यात आला.

हे आंदोलक शहर पोलिस ठाण्यात आले. यानंतर पोलिस निरीक्षकांना अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर कारवाई करू, असे आश्वासनही यावेळी पोलिसांनी दिले. मात्र जोपर्यंत अधिकृतपणे एफ.आय.आर नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलिस ठाण्यातून हलणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या