घरमालकांनी भाडेकरुकडे भाड्याचा तगादा लावू नये असे सरकाने दिले होते निर्देश…
पुणे : लॉक डाऊनच्या काळात घरमालकांनी भाडेकरुकडे भाड्याचा तगादा लावू नये असे निर्देश सरकाने दिले होते. तसेच भाडे देण्यास तीन महिण्याची सवलत द्यावी अशी सूचनाही केली होती. यानंतर ठिकठिकाणी घरमालक आणी भाडेकरु यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. याप्रकारच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. पोलिस आयुक्तांकडे आलेल्या एका विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना शहरांमध्ये घर मालक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याकडून तसेच भाडेकरूकडून घर भाडे सक्तीने वसूल करत आहेत, घर भाडे देत नसल्यास घर खाली करण्याच्या धमक्या देत आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांना दिल्या होत्या. त्यानुसार आज रोजी मेघा बोथरा हिने पोलिस उपायुक्त गुन्हे यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती. यामध्ये तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे पूर्व तयारीकरीता ती चंद्रपूर येथून पुणे येथे आली असून नवी पेठ येथे एका महिलेच्या घरी म्हणून पेईंग गेस्ट म्हणून भाड्याने रहात असल्याचे सांगितले.
Read More आता तुम्हाला केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार
सध्या COVID-19 या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन चा कालावधी जाहीर केलेला आहे. यामुळे ती घर मालकीनीला ठरल्याप्रमाणे 1700/-दरमहा घरभाडे देऊ शकत नाही. मात्र घर मालक घर भाड्यासाठी वारंवार तगादा लावत असून घर भाडे दे नाहीतर रूम खाली कर असे वारंवार धमकावत आहेत अशी नमूद केले होते.
महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग मुंबई यांची सूचना प्रसिद्ध झालेली असून लॉकडाउन कालावधीत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही घरमालकाने भाडेकरूकडून सक्तीने घर भाडे वसूल करू नये किमान 3 महिने वसुली पुढे ढकलावी अशा लेखी सूचनाचा आदेश जाहीर झालेला आहे. याची कल्पना असतानासुध्दा मेधा बोथरा ह्या लॉकडाऊन मुळे घरभाडे देऊ शकत नसल्याने त्यांना घर मालक माझे घर दुरुस्त करायचे आहे असा बहाणा करून घर भाड्यासाठी घर खाली करण्यास भाग पाडत होत्या. याची गंभीर दखल घेत आहेत उपाआयुक्त (गुन्हे) बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली घर मालकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.