35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home लॉकडाऊनमध्ये भांडी विक्री करणा-यावर गुन्हा दाखल

लॉकडाऊनमध्ये भांडी विक्री करणा-यावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : प्रतिनिधी
शहरातील व्यंकटेश भांडी सेंटरचे व्यापारी महेंद्र उर्फ कृष्णा येरावार यांनी लाँकडाउन संचारबंदी जमावबंदी आदेश पायदळी तुडवित भांडी विक्रीचा व्यापार सुरू दुकाना ऐवजी गोदामातुन करत आसल्या प्रकरणी अखेर नाट्यमय घडामोडीतुन सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास कोकाटे यांचा फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आसल्याने सर्वञ संचारबंदी जमावबंदी सह लाँकडाउन करण्यात आल्याने केवळ जिवनावश्यक वस्तुचा दुकानास केवळ चार तासाची सवलत देण्यात आलेली आसताना शहरातील भगवती चौकातील व्यंकटेश भांडी सेंटर महेंद्र उर्फ कृष्णा येरावर हे लाँकडाउन काळात भांडी विक्रीचा व्यापार उघडपणे करीत होते.सदरील दुकाचा एक दरवाजा उघडा ठेवत नागरिकांना दुकानात घेत बाहेरून दुकान बंद तर आतुन भांडी विक्री मोठ्या प्रमाणात सुरूच होती.याबाबत अनेकांनी तक्रार करून सुद्धा पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.

इसाद परीसरातील काही नागरिकांना लग्नाचा भांडी खरेदीसाठी व्यंकटेश भांडी सेंटर मध्ये गंगाखेड शुगर संचालक बापुसाहेब सातपुते यांनी पाठविले आसता सदरील नागरिकांना दुकाना ऐवजी महेंद्र उर्फ कृष्णा येरावार यांनी गोदामात नेले.ही बाब बापुसाहेब सातपुते यांनी गस्तीवर आसलेल्या पोलिसास सांगतली आसता त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना कळवताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरिक्षक कोकाटे यांनी धाव घेतली आसता भांडी विक्रीचा प्रकार उघडपणे दिसून आला.

या प्रकरणी व्यापारी कृष्णा येरावार यास ताब्यात घेत पोलिस निरिक्षक वाय.एन.शेख समोर हजर करण्यात आले.पण उशीरा पर्यत व्यापारी महेंद्र उर्फ कृष्णा येरावार याचावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता या प्रकरणी गंगाखेड शुगर संचालक बापुसाहेब सातपुते यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना झालेला प्रकार सांगण्यात येउन लाँकडाउन जमावबंदी संचारबंदी कायदा धाब्यावर बसवून खुलेआम भांडी विकणा-या महेंद्र उर्फ कृष्णा येरावार यांना रंगेहात पकडवुन सुद्धा पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नसल्याचा खुलासा केला अखेर नाट्यमय घडामोडीतुन स.पो.निरिक्षक विकास कोकाटे यांचा फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या