37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रआ. अमोल मिटकरींविरोधात तक्रार दाखल

आ. अमोल मिटकरींविरोधात तक्रार दाखल

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी जाहीर सभेत हिंदू धर्माचा अवमान केल्याप्रकरणी येथील अ‍ॅड. विद्याधर कुलकर्णी यांनी इस्लामपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. ७ सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँंग्रेसच्या परिवार संवादयात्रेत मिटकर यांनी २१ एप्रिल २२ रोजी इस्लामपूरच्या जाहीर सभेत हिंदू विवाह धर्मपरंपरा व चालीरीतीपैकी कन्यादान या विधीची टिंगल उडविली. यामध्ये कुठेही विवाह लावणारे पुरोहित वधू किंवा वराचा हात हातामध्ये घेत नाहीत. ‘मम भार्या समर्पयामी’ असा मंत्र किंवा संकल्पही विधीमध्ये नाही. तरीदेखील जाहीर सभेत टिंगल करत मिटकरी यांनी हिंदू धर्मावर विश्वास असणा-या व हिंदू धर्माचे पालन करणा-या प्रत्येक व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

तसेच जाती-धर्मामध्ये तेढ उत्पन्न करणारे असे हे त्यांचे वक्तव्य आहे.
या जाहीर सभेमध्ये विवाह विधी, कन्यादान या विषयाचा कोणताही संबंध नसताना, ही राजकीय सभा सुरू असताना मुद्दामहून हा विषय काढून मिटकरी यांनी हिंदू धर्मातील एका उच्च परंपरेची ंिटगल केली आहे. त्यांनी भा.दं.वि. कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा केला असल्याने त्यांना कठोर शासन व्हावे, असे अ‍ॅड. कुलकर्णी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या