24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रअखेर ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा

अखेर ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा

एकमत ऑनलाईन

नाशिक : राज्यातील रहिवासी व परराज्यात शिकणा-या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकेतर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्­काबाबत दोन ऑगस्टला बंद केलेली योजना पूर्ववत झाली आहे. यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली. त्­यामुळे परराज्यात शिक्षण घेणा-या विभमुक्­त जाती, भटक्­या जमाती (विजाभज), विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) आणि इतर मागास प्रवर्गातील (इमाप्र) विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील रहिवासी व परराज्यात शिकणा-या विजाभज, विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्­क योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या विरोधात आवाज उठवत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी योजना बंद न करण्याची मागणी इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. या मागणीनंतर राज्य शासनाकडून ही योजना पूर्ववत केली आहे.

भुजबळ म्­हणाले, की सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व सामाजिक न्याय विभागाच्या प्रचलित धोरणानुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्चशिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत धोरण निश्चित करण्याची बाब विचाराधीन असल्याचे कारण देण्यात आले होते व २५ मार्चचा महाविकास आघाडीचा शासन निर्णय २ ऑगस्टच्या निर्णयानुसार रद्द ठरविला होता.

२५ मार्चच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील रहिवासी असणारे विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच इतर मागास व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थी जे राज्याबाहेर परराज्यात खासगी विनाअनुदानित व कायम अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे, अशा योजनेचा लाभ मिळत होता.

अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती, शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती आणि निर्वाह भत्ता जमा केला जात होता. आता ऑगस्­टमधील शासन निर्णय मागे घेतल्­याने विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या