बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर; ‘आयसीसी’ने केली अधिकृत घोषणा
सिडनी : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये डिसेंबर महिन्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका होण्याची चिन्हे आहेत. यजमान ऑस्ट्रेलियाने वर्षअखेरीस मालिकेचे नियोजन आखले असून चार ठिकाणेही निश्चित केली आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका रद्द होईल, की पुढे ढकलली जाईल, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करून तयारी दर्शवली आहे. सध्या भारतात क्रिकेट सामने बंद आहेत, मात्र काही देशांनी हळूहळू सामने खेळवण्याची चाचपणी सुरू केली आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनची निवड करण्यात आली आहे. हा सामना ३ ते ७ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. मालिकेचा दुसरा कसोटी सामना डे-नाईट खेळवला जाणार आहे. अॅडलेडमध्ये ११ ते १५ डिसेंबर दरम्यान हा सामना रंगेल.
मालिकेचा तिसरा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. तर सिडनीमधील चौथा सामना ३ ते ७ जानेवारी या कालावधीत होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया एकाच ठिकाणी सर्व कसोटी सामने खेळतील, असे आधी वृत्त होते. मात्र ऑस्ट्रेलियाने चार वेगवेगळ्या स्टेडियमची तयारी केल्याचं दिसतं.
दरम्यान, २०१८-१९ मध्ये खेळवण्यात आलेली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका भारताने २-१ ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच टीम इंडियाने आॅस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला. याबरोबरच भारतीय संघ हा ऑस्ट्रेलियाच्या भूमीत यजमानांना कसोटी मालिकेत पराभूत करणारा केवळ पाचवा पाहुणा संघ ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्याच भूमीवर इंग्लंड, विंडीज, न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिका या केवळ ४ संघांनी मात दिली होती. २०१८-१९च्या कसोटी मालिका विजयानंतर भारताचे नावही या यादीत सामील झाले. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पर्थमध्ये अफगाणिस्तान संघाविरुद्ध कसोटी सामना खेळून मोसमाची सुरुवात करेल. या दोन देशांमधील हा पहिलाच कसोटी सामना असेल.
Read More अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी 4 जूनला होणार सुनावणी
ऑस्ट्रेलियाने ४ मैदानांची नावे निश्चित केली होती
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौºयावर जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचे आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकते. याच कारणासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. स्थानिक ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ४ मैदानांची नावे निश्चित केली होती.
मैदानांची नावे
पहिली कसोटी – ३ ते ८ डिसेंबर (ब्रिस्बेन)
दुसरी कसोटी (दिवस-रात्र) – ११ ते १५ डिसेंबर (अॅडलेड ओव्हल)
तिसरी कसोटी (बॉक्ंिसग डे)
– २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी (सिडनी)