28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांवर पुन्हा आर्थिक संक्रात?

एसटी कर्मचा-यांवर पुन्हा आर्थिक संक्रात?

एकमत ऑनलाईन

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे महामंडळ पेचात
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे सणासुदीच्या तोंडावर एसटी कर्मचा-यांवर आर्थिक संक्रात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचा-यांचे पगार कसा करायचा असा प्रश्न महामंडळासमोर आला आहे. एसटी महामंडळाला सरकारकडून ३६० कोटी ऐवजी आता केवळ १०० कोटी रूपये निधी मिळत असल्यामुळे उर्वरित २०० कोटी रूपये आणायचे कुठुन असा प्रश्न महामंडळासमोर पडला आहे.

एसटी महामंडळाने पैसे नसल्यामुळे गेल्या २ महिन्यांपासुन ९० हजार एसटी कर्मचा-यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केलेला नाही. एसटी महामंडळाचे प्रती महिना ४५० कोटी रूपये उत्पन्न तर खर्च प्रती महिना ६५० कोटी रूपये आहे. एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रती महिना पगारासाठी ३१० कोटी, डिझेल २५० कोटी तर इतर आस्थापनासाठी ९० कोटी रूपये खर्च होतो. एसटी महामंडळाला सरकारकडून ३६० कोटी ऐवजी आता केवळ १०० कोटी रूपये निधी मिळत असल्याने उर्वरित २०० कोटी रूपये आणायचे कुठून असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

एसटी कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जवळजवळ पाच महिने संप केला होता. हा संप ऐतिहासिक संप ठरला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारकडून त्यांच्या काही मागण्या मान्य पूर्ण केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारकडून विलिनीकरणाची मागणी वगळता इतर मागण्या मान्य करत एसटी कर्मचा-यांची वेतनवाढ केली होती त्याचबरोबर महामंडळाला आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती. आता शिंदे सरकारच्या काळात पुन्हा वेतनाचा प्रश्न निर्माण होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या