26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रबेळगावसह सीमा भागातील ८६५ गावांना आर्थिक बळ!

बेळगावसह सीमा भागातील ८६५ गावांना आर्थिक बळ!

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्राचे कर्नाटकला जशास तसे उत्तर,
धर्मादाय देणगी निधीतून अर्थसा करणार
मुंबई : कर्नाटकने महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केल्यानंतर आता महाराष्ट्राने कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र राज्याकडून आता सीमा भागातील बेळगावसह ८६५ गावांतील संस्था आणि संघटनांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था आणि संघटनांनादेखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सीमा प्रश्नी नुकत्याच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुरुवारी या संबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचादेखील यात समावेश करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला असल्याचे सांगत या गावांना कर्नाटकात घेण्याचा सरकार गंभीर विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा ट्वीट करून मराठी भाषिक आणि महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावे, अशी मागणी बोम्मई यांनी केली. आता महाराष्ट्र सरकारनेही सीमा भागातील ८६५ गावांतील संघटना आणि संस्थांना आर्थिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या