33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeनागपूरातील महात्मा फुले भाजी बाजारात आग, आगीत 18 दुकाने जळून खाक

नागपूरातील महात्मा फुले भाजी बाजारात आग, आगीत 18 दुकाने जळून खाक

एकमत ऑनलाईन

अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले ;कुठलीही जीव हानी नाही

नागपूर :  नागपूरातील मध्यवर्ती भागातील सर्वात मोठा भाजी बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा फुले भाजी बाजारातील काही दुकानांना आज दुपारी आग लागली. या आगीत जवळपास 18 दुकाने जाळून खाक झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हा बाजार 50 दिवस बंद ठेवण्यात आला होता.

Read More  नेमकं हे शक्य आहे का? 2 आठवड्यांतच जवळपास 65 लाख नागरिकांची कोरोना टेस्ट

त्यानंतर गेल्याच आठवड्यात अटी व शर्तींसह हा बाजार खुला करण्यात आला. या बाजारातील एका दुकानास आज दुपारी सव्वा चार च्या सुमारास आग लागली, अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली तोपर्यंत पाहता पाहता ही आग रांगेतील 18 दुकानांपर्यंत पोहचली होती. दरम्यान अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीव हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही तरी विद्युत शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या