बोगोटा : कोलंबिया येथील एका कारागृहात दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, या प्रयत्नात भीषण आग लागल्याची घटना घडली समोर आली आहे.
या घटनेदरम्यान, पळून जाण्याचा प्रयत्न करणा-या कैद्यांमध्ये एकूण ५१ कैदी ठार झाले आहेत. तसेच २४ पेक्षा अधिक कैदी जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याने देशभर हळहळ व्यक्त होत आहे.
नॅशनल प्रिझन्स एजन्सीच्या अधिका-याने या घटनेबाबतची माहिती दिली आहे. नॅशनल पेनिटेंशरी अँड प्रिझन इन्स्टिट्यूटच्या प्रवक्त्याने सांगितले की, आतापर्यंत ५१ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या घटनेत २४ हून अधिक कैदी जखमी झाले आहेत. तर ५१ जणांचा मृत्यू झाला.
कोलंबियाच्या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, कोलंबियन तुरुंगात ८१,००० कैद्यांची क्षमता असताना आता सुमारे ९७,००० कैद्यांना ठेवण्यात आले आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी या घटनेसंदर्भात ट्विट करत लवकरच या घटनेची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
तुलुआ, व्हॅले डेल येथील तुरुंगात घडलेल्या घटनेबद्दल आम्हाला अतिशय दु:ख झाले आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे ट्वीट करत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.