16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeसोलापूरसोलापुरात आग, सूताचे कारखाने खाक

सोलापुरात आग, सूताचे कारखाने खाक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत सूताचे कारखाने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेचे अग्निशामक दल अधिकारी व कर्मचारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आगीवर पाण्याचा फवारा करत होते. पण आगीन रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आग नियंत्रणात येत नव्हती. अग्निशमन दलाने जवळपास १५ ते २० गाड्यांचा फवारा केला. तरीही आग वाढतच चालली होती. रात्री उशिरा आग नियंत्रणात येण्यास मदत झाली. मात्र, तोपर्यंत कारखाना जळून खाक झाला.

अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नीलमनगर येथील दोन टॉवेल कारखाने, एक रेडिमेड गारमेंट कारखान्याला शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. सोशल मीडियामार्फत आगीचे व्हिडीओ आणि फोटो वा-यासारखे वायरल झाले. आगीचे रौद्र रूप पाहून अनेक नागरिक नीलमनगर परिसरातील एमआयडीसीकडे धाव घेत होते. सोलापूर शहर पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारीदेखील दाखल झाले.

 

लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

अक्कलकोट रोड परिसरातील नीलमनगर येथील मुनोत सूत कारखान्याला आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे सूत, कच्चा माल, पक्का माल जळून खाक झाला. वसंत नेमचंद मुनोत एक्स्पोर्ट टॉवेल कारखान्याला आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दल अधिकारी केदार आवटे यांनी दिली. आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या