19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत कंपन्यांना आग, तिघे ठार

मुंबईत कंपन्यांना आग, तिघे ठार

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे खैरने आद्योगिक वसाहतीत शुक्रवारी (६ मे) दुपारी लागलेली आग अद्याप शमलेली नाही. यात तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही रबर कंपनीत काम करणारे होते. अय्यर, निखिल असे मृत व्यक्तींची नावे असून त्यांचे पूर्ण नाव कळलेले नाही, तर तिस-या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तिसरा मृतदेह १२ च्या सुमारास आढळून आला. एमआयडीसीतील भूखंड क्रमांक १४२ वेस्ट कोस्ट पॉलीकेम या रासायनिक कंपनीला शुक्रवारी दुपारी आग लागली होती. रासायनिक कंपनीत रासायनिक द्रव्यांचे स्फोट होत असल्याने आगीजवळ जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या