23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय'ईडी'च्या पाच अधिकाऱ्यांना करोनाची लागण

‘ईडी’च्या पाच अधिकाऱ्यांना करोनाची लागण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : करोनाचा शिरकाव सर्वच ठिकाणी होताना दिसत आहे. कारण सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे. तर, करोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read More  पहिलाच प्रयोग दिलासादायक :कोरोना रूग्णांवर कोल्हापुरात यशस्वी प्लाझ्मा थेरेपी

दरम्यान, निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोना व्हायरसमुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या