31.2 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeराष्ट्रीयपुंछमध्ये अतिरेक्यांच्या हँडग्रेनेड हल्ल्यात पाच जवान शहीद

पुंछमध्ये अतिरेक्यांच्या हँडग्रेनेड हल्ल्यात पाच जवान शहीद

एकमत ऑनलाईन

पुंछ : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनाला लागलेल्या आगीत पाच जवानांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला नवीन वळण लागले असून या घटनेमागे अतिरेक्यांचा हात असल्याचे लष्कराने निवेदन जारी केले आहे.

लष्कराच्या उत्तरी कमांड मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, आतंकवाद्यांनी दुपारी ३ च्या सुमारास लष्कराच्या वाहनावर हातबॉम्ब फेकले, ज्यामुळे आग लागली असावी. या अपघातात राष्ट्रीय रायफल्सच्या पाच जवानांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या जवानांना परिसरातील अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईचा एक भाग म्हणून तैनात करण्यात आले होते.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका जवानावर राजौरी येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या हल्लेखोरांचा शोध सुरू असून या प्रकरणी अजून माहिती गोळा करण्याचे काम लष्कराकडून सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या