22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयफरिदाबाद कारागृहात पंचतारांकिंत दर्जाचे जेवण

फरिदाबाद कारागृहात पंचतारांकिंत दर्जाचे जेवण

एकमत ऑनलाईन

फरिदाबाद : जेवणाची चव आणि दर्जा चांगला नसला तर अनेक जण त्याला सर्रास जेल मधल्या कैद्यांना मिळणा-या जेवणाची उपमा देतात, मात्र यापुढे अशी उपमा देताना थोडा विचार करा. कारण भारतात एक असे कारागृह आहे जिथे कैद्यांना मिळणा-या अन्नाचा दर्जा चक्क पंचतारांकित हॉटेल इतका चांगला आहे. वाचून आश्चर्य वाटत असले तरी हे खरे आहे. उत्तर प्रदेशातील फरिदाबाद जिल्ह्यातील फतेहगड येथे हे तुरुंग आहे. या तुरुंगात कैद्यांना पंचतारांकित दर्जाचे भोजन दिले जात आहे.

हे रेटिंग एफएसएसएआय या संस्थेने दिले आहे. तुरुंगात ११०० पेक्षा अधिक कैदी आहेत. विशेष म्हणजे तुरुंगातील कैदी हे एखाद्या नामांकित हॉटेलच्या शेफप्रमाणे अँप्रनचा पेहराव करून भोजन तयार करतात.

एफएसएसएआयने दिले प्रमाणपत्र
भारतातच काय तर जगभरात तुरुंगांतील जेवणाच्या दर्जावरून नेहमीच प्रश्­नचिन्ह उपस्थित केले जातात. निकृष्ठ अन्नाच्या विरोधात अनेकदा कैदी तुरुंगातच आंदोलन देखील करतात. परंतु उत्तर प्रदेशातील एका तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणा-या भोजनाला पंचतारांकितचा दर्जा मिळाला.

पंचतारांकित चिन्ह प्रदान
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने फतेहगड येथील तुरुंगातील भोजनास अव्वल रेटिंग दिली. एफएसएसएआयच्या प्रमाणपत्रात पंचतारांकित चिन्ह असून उकृष्ट असा शेरा मारला आहे. तुरुंगाधिकारी अखिलेश कुमार यांनी म्हटले की, हे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी कर्मचा-यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते.

अशी आहे जेवणाची गुणवत्ता
भोजनाची गुणवत्ता ही अन्न धान्य आणि जेवण तयार करणा-यांचा ड्रेस कोड यांवरून ठरते. या तुरुंगात शाकाहारी भोजन तयार केले जाते. तुरुंगातील कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सात्त्विक भोजन दिले जाते. त्यात मसूर, हरभ-याची डाळ, उडीद डाळीचा समावेश आहे. या डाळी कैद्यांना आलटून पालटून दिल्या जातात. एफएसएसएआयच्या वतीने पॅनलमध्ये सामील असलेल्या तपासणी पथकाने येथील अन्न धान्यांना अव्वल दर्जा दिला आहे. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविणारे हे पहिलेच कारागृह आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या