21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeपाच हजार व्यवसायिकांना मिळणार लाभ

पाच हजार व्यवसायिकांना मिळणार लाभ

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरातील पथ विक्रेत्यांचे आर्थिक सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत पथ विक्रेत्यांना महानगरपालिकेच्या वतीने कर्ज शिफारस पत्र वाटप करण्यात आले. किमान पाच हजार व्यवसायिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रशासनाने प्रयत्नशील राहणार असून या योजनेसाठी कसल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.

पथ विक्रेत्यांना यात सहभागी होण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. या योजनेचा लाभ शहरातील अधिकाधिक विक्रेत्यांना मिळावा यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी यावेळी बोलताना दिली.

महापालिकेच्या सभागृहात महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, उपायुक्त शशीमोहन नंदा, नगरसेवक आयुब मणियार, रघुनाथ मदने यांच्या हस्ते ज्या फेरीवाल्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाइन कर्जाचा अर्ज भरला आहे त्यांना महापालिकेकडून प्राथमिक स्वरुपात प्रोव्हिजनल सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. याप्रसंगी फेरीवाला समिती सदस्य गौस गोलंदाज, त्र्यंबक स्वामी, सायरा पठाण, विजय गोरे, काळदाते आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत दि. २४ मार्च २०२० पूर्वी असणारे पथविक्रेते, महापालिकेने प्रमाणपत्र प्रदान केलेले तसेच महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले परंतु विक्री प्रमाणपत्र नसलेल्या पथविके्रत्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या अंतर्गत पथ विक्रेत्यांना एक वर्ष मुदतीसाठी १० हजार रुपयांचे खेळते भांडवल दिले जाणार असून मुदतीत परतफेड केल्यानंतर ७ टक्के व्याज अनुदान योजनेस हे पथविक्रेते पात्र राहणार आहेत.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, वाहन चालवण्याचा परवाना, आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक व मतदान ओळखपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.  सेतू केंद्राच्या माध्यमातून किंवा स्वत: ऑनलाइन प्रणालीद्वारे हे अर्ज करता येणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. शहरातील अधिकाधिक पथ विक्रेत्यांनी या योजनेत सहभागी व्हावे.

किमान पाच हजार व्यवसायिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रशासनाने प्रयत्नशील राहणार असून या योजनेसाठी कसल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. पथ विक्रेत्यांना यात सहभागी होण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. यासंदर्भात कसलीही अडचण असेल तर यंत्रणेशी संपर्क साधावा,असे आवाहनही महापौर व उपमहापौर यांनी यावेळी बोलताना केले.

यंत्रांवर विश्वास वाढवणारे दिवस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या