23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रबंडखोरीचे कारण आधी फिक्स करा; राऊतांचा शिंदे गटाला सल्ला

बंडखोरीचे कारण आधी फिक्स करा; राऊतांचा शिंदे गटाला सल्ला

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद आणि टीका-टिप्पणी दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे.

शिवसेनेकडून आज सकाळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले होते. आता संजय राऊत यांनी पुन्हा बंडखोर आमदारांवर खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, बंडखोरांनी शिवसेना सोडली तेव्हा सर्वांत आधी हिंदुत्वाचं कारण दिलं होतं. त्यानंतर सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आम्ही बाहेर पडलो. मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता.

इथेच न थांबता उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत, म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशी ८ ते १० कारणं शिंदे गटाने दिली. त्यामुळे आधी शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारण निश्चित करावं. त्यासाठी कार्यशाळा घ्यावी, असा सल्ला राऊत यांनी शिंदे गटाला दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या