23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीपालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन

एकमत ऑनलाईन

परभणी : महाराष्ट्र दिनाच्या वर्धापण दिनानिमित्त १ मे रोजी येथील स्टेडिअम मैदानावर सकाळी ८ वाजता आयोजित केलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहनाच्या कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय्य व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते ध्वजारोहन होणार आहे.

पालकमंत्री मुंडे हे सकाळी ८ वाजता ध्वजारोहनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून ८.३५ मिनिटांनी परभणी जिल्हा ऐतिहासिक आभासीसह या चित्र मालिकेच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करणार आहेत. तेथून महिला व बालविकास भवन वसमत रस्त्यावरील जिल्हा ग्रंथालय शेजारील इमारतीचे भूमिपूजन करणार असून ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या खरीप हंगामाच्या नियोजन बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.

१०.३० वाजता पाणी टंचाईचा आढावा, ११ वाजता रमाई घरकुल आवास योजनेचा आढावा घेणार असून १२ वाजता ते माजी खासदार सुरेश जाधव यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. १ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीस हजेरी लावून दुपारी ३ वाजता ते श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शनने आयोजित केलेल्या कार्यक्रमास बी. रघुनाथ सभागृहात हजेरी लावून परळीकडे रवाना होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या