25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रहैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण

हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणा-या सर्वच ज्ञात-अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन! हा लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वत:ची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानले. त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू, असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छ भारतसाठी १२००० कोटी मिळाले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळ कमी झाला पाहिजे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवले पाहिजे, विकास कामाचा आम्ही वॉर रूममधून आढावा घेत आहोत. जो काही बॅकलॉक आहे तो भरून काढण्याचे काम महाराष्ट्र सरकार करेल. मराठवाडा वॉटर ग्रीडसह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक समाजातील घटकांचे सरकार आहे, असे ते म्हणाले.

अंबादास दानवे यांच्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले की, एमआयडीसीसाठी जो भूखंड दिला आहे त्याला कोणतेही स्थगिती दिली नाही. त्याची माहिती घेण्याच्या फक्त सूचना दिल्या आहेत. नवीन उद्योगांना जास्तीत जास्त सवलती देण्यासाठी हा प्रयत्न आहे. मागील दोन-अडीच वर्षांत काय झाले यावर मी बोलणार नाही. पण यापुढे उद्योग येतील त्यांना पूर्ण सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा
औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी १३६ कोटी
पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार
जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार
मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प
जालना पाणीपुरवठा नूतनीकरण
नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार
लातूरमध्ये कृषि महाविद्यालयाची तरतूद
मराठवाडा वॉटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या