22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeसोलापूरसोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा

सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा

एकमत ऑनलाईन

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंना पहिले यश

सोलापूर : पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटासोबत संघर्ष सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिले यश मिळाले आहे. सोलापूरमधील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व सात जागा जिंकल्या आहेत.

ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाने सोलापुरात वर्चस्व असणारे माजी सहकारमंत्री आणि भाजपा आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील २५ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरुवात झाली. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून सर्वांत प्रथम चिंचपूर ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या गटाने सातपैकी सर्व सात जागा जिंकत भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाला धक्का दिला आहे.

माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.
आज राज्याच्या १५ जिल्ह्यांतील २३८ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागत आहे. या निवडणुकीचा निकाल काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या