19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रसोयाबीनच्या दरात चढ-उतार

सोयाबीनच्या दरात चढ-उतार

एकमत ऑनलाईन

शेतक-यांत नाराजी, तुरीला मात्र चांगला भाव

अकोला : ल्यातील अकोट बाजार समितीमधील तूर आणि सोयाबीनचे खरेदी दर जाहीर झाले आहेत. आज अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर स्थिर पाहायला मिळाले. तर कापसाच्या दरातही घसरण झाली असली तरी शनिवारच्या तुलनेत दर १०० रुपयांनी वाढला. हा भाव ८ हजार २०० पासून ८ हजार ७०५ रूपयांपर्यत होता. आता शेतकऱ्यांना तुरीकडून आशा आहेत, कारण आज तुरीचा भाव ६ हजार ७५० पासून ७ हजार ६४५ रूपये असा होता. सध्या तूर अन् सोयाबीनच्या दरात चढ़-उतार होत असून आवक वाढली आहे.

आज सोमवारी अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी बाजार समितीमध्ये सोयाबीनला आजचा भाव ४ हजार ७५० ते ५ हजार ३७५ रूपये होता. दरम्यान सोयाबीनच्या आवक मध्ये वाढ झाली असून आज १ हजार ७५ क्विंटल सोयाबीन खरेदी झाला आहे. तर, कापूस खरेदीचा सरकारी दर ६ हजार तीनशेच्या जवळपास आहे आहे. परंतु, अकोटमध्ये आजचा कापसाला ८ हजार २०० पासून ८ हजार ७०५ रूपये इतका भाव मिळाला. दरम्यान, कापसाच्या भावात दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण झाली असली तरी शनिवारच्या तुलनेत दर वाढले आहेत. आतापर्यंत अकोट बाजार समितीमध्ये ९७ हजार क्विंटलहून अधिक कापूस खरेदी झाला असून आज सोमवारी २ हजार १०० क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. कापसाची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान कापसाचे दर स्थिर राहणार असून आगामी काही दिवसात कापसाला चांगला भाव मिळणार असल्याचे संकेत आहेत.

शेतकऱ्यांना तुरीकडून आशा…
आपल्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून शेतकरी नेहमीच प्रतीक्षेत असतो. मात्र असं असलं तरी अकोल्यातील अकोटच्या बाजार समितीमध्ये आज शेतकरी आपल्याकडे असलेल्या तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. कारण सोयाबीन आणि कापसाचे दरांमुळ आता शेतकऱ्यांना तुरीकडून अपेक्षा राहिली आहे, कारण तुरीचे सातत्याने दर वाढत चालले आहेत. तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज आकोटच्या बाजारात २ हजार ९६० क्विंटल तूर खरेदी झाली असून ६ हजार ७५० पासून ७ हजार ६४५ इतका तुरीला भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीकडून आशा आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या