25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home महाराष्ट्र कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा ! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा ! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१६ (प्रतिनिधी) केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात राज्‍यात तीव्र पडसाद उमटले आहेत.अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. राज्‍य सरकारही कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असून याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्‍याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

कांदा निर्यायतबंदीचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीतही उमटले.राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठविण्यात येईल तसेच पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात आपले विचार मांडले. यावेळी प्रधान सचिव अनुप कुमार यांनी २०१८-१९ मध्ये २१.८३ लक्ष मेट्रिक टन, २०१९-२० मध्ये १८.५० लक्ष मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे सांगितले. मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जेएनपीटीमध्ये सध्या ४ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. बांगला देश, नेपाळ सीमेवर ५०० ट्रक्स थांबून आहेत.

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या