लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका आस्थापनेवर सुमारे ९०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून यापैकी सर्वाधिक कर्मचारी वर्ग ४ वर्ग ३ श्रेणीमधील आहेत. इतिहासात प्रथमच ३ कर्मचाºयांना वरिष्ठ लिपिक तर १२ कर्मचा-यांना कनिष्ठ लिपिकपदी पदोन्नती देण्यात आली़
मनपा कर्मचा-यांना मागील अनेक वर्षापासून पदोन्नतीची प्रतीक्षा करावी लागत होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीही कर्मचा-यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. याच अनुषंगाने लातूर महानगरपालिकेत वर्ग ४ व वर्ग ३ मध्ये कार्यरत असणा-या कर्मचा-यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला आहे. ३ कर्मचा-यांना वरिष्ठ लिपिक तर १२ कर्मचाºयांना कनिष्ठ लिपिकपदी पदोन्नती देण्यात आली. याबाबतचे आदेश मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांनी निर्गमित केले आहेत. अनेक वर्षाची प्रतीक्षा संपत मनपाच्या इतिहासात प्रथमच पदोन्नती मिळाल्याने सर्व कर्मचा-यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांची भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले.
Read More कोरोना संकटात पंतप्रधान मोदींची बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा
कनिष्ठ पदावर कार्यरत असलेले राघवेंद्र नाईक, एस. एम़ निरगुडे, जाफरपाशा कादरी यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली तसेच वर्ग ४ श्रेणीमध्ये कार्यरत असलेले संतोष लाडलापुरे, बंडू आर्विकर, बालाजी शिंदे, संतोष ठाकूर, अनिल सूर्यवंशी, प्रदीप जोगदंड, छाया आखाडे, प्रवीण कांबळे, महादेव साठे, असलम शेख, सजन शेख, रंदावनी पवार यांना कनिष्ठ लिपिकपदी पदोन्नती देण्यात आली. मनपा कर्मचा-यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे कर्मचा-यांचे मनोबल वाढीस लागून मनपाच्या कार्यक्षमतेमध्ये भर पडणार आहे.