अंतराळवीर १९ तासांचा प्रवास करुन अंतराळ स्थानकात पोहोचतील
फ्लोरिडा: जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पेसएक्स या खासगी कंपनीच्या यानातून अमेरिकेचे अंतराळवीर ‘स्पेस स्टेशन’च्या दिशेने रवाना झाले. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि स्पेसएक्स यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. यानिमित्ताने तब्बल ९ वर्षांनतर अमेरिकेचे अंतराळवीर अंतराळात गेले आहेत.
अंतराळवीर १९ तासांचा प्रवास करुन अंतराळ स्थानकात पोहोचतील
स्पेसएक्सच्या फाल्कन ९ या खासगी रॉकेटमधून अमेरिकेचे २ अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने (स्पेस स्टेशन) रवाना झाले. या मोहिमेसाठी रॉकेटचे उड्डाण फ्लोरिडातील केप कॅनरवल येथील जॉन एफ केनेडी अंतराळ संशोधन केंद्रातून झाले. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री १ वाजता हे उड्डाण झाले. प्रतिकूल हवामानामुळे उड्डाण ३ दिवसांचा विलंब झाला. ड्रॅगन कॅप्सुल आणि फाल्कन ९ या खासगी रॉकेटचे व्यवस्थित उड्डाण झाले.
९ वर्षांनंतर माणसासह रॉकेट अंतराळात पाठवले
अमेरिकेने तब्बल ९ वर्षांनंतर माणसासह रॉकेट अंतराळात पाठवले आहे. ९ वर्षांनंतर अमेरिकेने ही कामगिरी केली. याआधी २०११ मध्ये अमेरिकेने अंतराळवीरांना अंतराळात पाठवले होते. यानंतर तब्बल ९ वर्षांनी नासाने अंतराळवीर अंतराळ स्थानकावर पाठवले आहेत. ही मोहीम एका खासगी कंपनीच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडली. नासाचे प्रशासक जिम ब्राइडेनस्टीन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी नासा आणि स्पेसएक्स यांनी संयुक्तपणे यशस्वी मोहीम राबवली म्हणून मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचेच कौतुक केले. मोहिमेत सहभागी झालेल्यांचा मला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. या निमित्ताने पहिल्यांदाच एका खासगी कंपनीच्या सहकार्याने अंतराळात माणूस पाठवण्याचा एक यशस्वी प्रयोग झाला आहे. यातून भविष्यात आणखी अनेक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read More अमित शहांचा कबुलीनामा; मरकज रोखला असता तर ही वेळच आली नसती
स्वयंचलित यंत्रांची चाचपणी करण्याचा निर्णय
नासाने स्पेसएक्ससोबतच्या मोहिमेच्या निमित्ताने जास्तीत स्वयंचलित यंत्रांची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात खासगी कंपन्यांच्या सहकार्याने नासा आणखी मानवी मोहिमा राबवू शकेल. यात संशोधनाचे बरेचसे काम स्वयंचलित यंत्र करतील आणि संशोधक यानात बसून निरिक्षणांच्या आधारे निष्कर्ष काढू शकतील. नासा-स्पेसएक्स यांच्या संयुक्त मोहिमेत अंतराळवीर मर्यादीत कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानकाच्या दिशेने रवाना झाले आहेत. विशिष्ट उद्दीष्ट पूर्ण झाल्यावर हे अंतराळवीर पुन्हा यानातून पृथ्वीवर परतणार आहेत. या निमित्ताने अंतराळ पर्यटन हा एक नवा पर्याय जगासाठी खुला होण्याची शक्यता आहे.
अंतराळवीर १९ तासांचा प्रवास करुन अंतराळ स्थानकात पोहोचतील
रॉबर्ट बेहेनकेन आणि डगलस हर्ले हे अंतराळवीर १९ तासांचा प्रवास करुन अंतराळ स्थानकात पोहोचतील. या मोहिमेसाठी २० वर्षांपूर्वी २०००मध्ये त्यांची निवड झाली होती. यानातून प्रवास करण्यासाठी तसेच नवे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सुल (स्पेसक्राफ्ट ड्रॅगन) या यानातून अंतराळवीर अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. फाल्कन ९ रॉकेटच्या मदतीने यानाने ठरल्याप्रमाणे व्यवस्थित उड्डाण केले आहे. स्पेसएक्स ही अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. त्यांनी अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी कंपनीची स्थापना केली आहे.
"I've heard that rumble before, but it's a whole different feeling when you've got your own team on that rocket. They are our team. They are America's team. This is #LaunchAmerica." — Administrator @JimBridenstine pic.twitter.com/E75QOPSFoY
— NASA (@NASA) May 30, 2020