24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयपहिल्यांदाच बिहार कॅबिनेट मुस्लिम मंत्र्याविना

पहिल्यांदाच बिहार कॅबिनेट मुस्लिम मंत्र्याविना

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. याचबरोबर यावेळी अन्य १४ मंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली. यानंतर परत एकदा बिहारमध्ये नितीशराज सुरू झाले. मात्र, यंदा प्रथमच बिहार कॅबिनेटमध्ये एकही मुस्लीम चेहरा नसल्याचे समोर आले आहे. एवढच नाहीतर बिहारमधील सत्ताधारी एनडीएकडे मुस्लिम समाजाचा एकही आमदार नाही.

स्वातंत्र्यानंतर कदाचित असे पहिल्यांदाच होत असेल, की बिहारमधील सत्ताधारी आघाडी विधानसभेतील सत्तेच्या खुर्च्यांवर मुस्लीम आमदाराविना बसली आहे. बिहारमधील एनडीएमध्ये भाजपा, जनता दल संयुक्त, हिंदुस्थान अवाम मोर्चा(सेक्युलर) व विकास इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तरी, यापैकी कोणत्याही एका पक्षाला मुस्लीम आमदाराला निवडून विधानसभेत पाठवता आलेले नाही. विशेष म्हणजे या राज्यात १६ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूने ११ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. मात्र, ते सर्वजण निवडणूक हरले. जेव्हा बिहारच्या कॅबिनेटने शपथ घेतली. तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एखादा मुस्लीम चेहरा कॅबिनेटमध्ये घेण्याची संधी होती व नंतर त्याला विधानपरिषदेवर घेता आले असते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कॅबिनेटची बांधणी करताना समजातील सर्व वर्गांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करूनही तसे काहीच घडले नाही.

कोरोनानंतर जगात चापरेचा कहर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या