कोल्हापूर : जोतिबा डोंगराला जाणा-या मुख्य रस्त्यावर पाण्याचा टाका भागातील रस्ता खचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जोतिबा डोंगराकडे जाणारी वाहतूक गायमुख तलावमार्गे सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. कोणत्याही वाहनाने प्रवेश करू नये यासाठी चर मारून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या मार्गावर सलग तीन वर्षांपासून रस्ता खचला आहे. गायमुख मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असली तरी या रस्त्यावरही दाणादाण उडाली आहे. मार्गावर अनेक ठिकाणी चिखल साचला आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत.