19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयदहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावले

दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दहशतवादावरून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला खडसावले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणा-या आणि रक्तपातास समर्थन करणा-या देशांच्या वक्तव्याला खपवून घेतले जाणार नाही असे संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत परराष्ट्र मंत्र्याने चीन आणि पाकिस्तानला ठामपणे सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राच्या साधारण अधिवेशनात ते बोलत होते.

भारत अनेक वर्षापासून अशा गोष्टी सहन करत आला आहे. आमच्या मते कुणीही दहशतवादाला समर्थन देणे चुकीचे आहे. त्याचबरोबर दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन आपण करू शकत नाही. कारण दहशतवादाला समर्थन म्हणजे रक्तपाताला समर्थन होय असे जयशंकर म्हणाले. अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणा-या दहशतवादी कारवाया आम्ही सहन करत आलो आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही दहशतवादी कारवाईचे समर्थन करत नसल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे.

भारत, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य मित्र देशांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी चीनकडून अडथळा आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या आणि भारताने सह-समर्थित केलेल्या प्रस्तावाला चीनने विरोध केला आहे. या प्रकारावरून एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर बोट ठेवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या