Sunday, September 24, 2023

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मागील महिन्यात १५ जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता व त्यावर त्यांनी यशस्वीरीत्या मात पण केली होती. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मध्यरात्री दोनच्या सुमारास निधन झाले त्यांच्यावर आज निलंग्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवाजीराव पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी होते. निलंगा गावाहूनच त्यांनी आपली राज्यच नव्हे देशभर निलंगेकर म्हणून ओळख निर्माण केली होती. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ पर्यंत म्हणजेच ०९ महिन्याच्या अल्प काळासाठी महाराष्ट्राचे १० वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

२००२ मध्ये मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते महसूलमंत्री होते. याशिवाय राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. तसेच ते काही काळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांना १९९५ मध्ये माणिकराव जाधव यांच्याकडून तर २००४ च्या विधानसभेत नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. पुढे २००९ विधानसभेत त्यांनी नातू संभाजी पाटील निलंगेकर यांचाही पराभव केला होता. नातू संभाजी हे माजी मंत्री तथा भाजप नेते आहेत.

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला असला तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही.

एक संघर्षशील व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने कोरोना विरूद्धची लढाई ते नक्कीच जिंकतील असा विश्वास निलंगेकर कुटूंबियांनी व्यक्त केला होता. त्यांचे वय ९१ वर्षे असल्याने व पूर्वीचे आजार लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. रूग्णालयात उपचार सुरू असतांना डाॅ. निलंगेकर वृृत्तपत्रे, पुस्तके नियमित वाचत होते. मधुमेह, रक्तदाब, किडणीचा त्रास त्यातच कोरोनाची लागण झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते.

लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं-सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.

Read More  डॉ. निलंगेकर यांनी केली कोरोनावर मात

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या