25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयकाँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना दोन वर्षांची शिक्षा

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना दोन वर्षांची शिक्षा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्क्ष राज बब्बर यांना एमपी-एमएलए कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना शिक्षा झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.

मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदारांची दिशाभूल करणे आणि पोलिंग एजंटशी वाद घातल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. राज बब्बर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या कारवाईमध्ये न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

वजीरगंज पोलिस ठाण्यामध्ये राज बब्बर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीतील अभिनयाने राज यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये उडी घेत लोकप्रियता मिळवली. काँग्रेसचे निष्ठावान नेते अशीही त्यांची ओळख आहे. दिल्लीच्या राजकारणात महत्वाचे स्थान असणा-या राज बब्बर यांचा राजकीय प्रवास देखील मोठा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते बॉलीवूडपासून लांब असले तरी बॉलीवूडच्या महत्वाच्या सोहळ्यांना त्यांची उपस्थिती दिसून आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या