25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

एकमत ऑनलाईन

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निधन झाल्याची माहिती एनएचके वृत्तवाहिनीच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरसभेत गोळीबार करण्यात आला होता. .

जपानच्या नारा शहरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. जपानच्या वृत्तसंस्था एनएचकेनुसार शिंजो आबे यांच्यावर भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. दुसऱ्या एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पश्चिम जपानमध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं भाषण सुरु होते. यावेळी ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी शिंजो आबे जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले. एनएचके चॅनलच्या रिपोर्टरने गोळीचा आवाज ऐकू आल्याचं म्हटलं. शिंजो आबे खाली पडल्यानंतर ते रक्तबंबाळ झाल्याचं दिसलं, असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे.

दोन हल्लोखोर अटकेत
जपानची वृत्तसंस्था द जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, गोळीबारात शिंजो आबे यांना गोळीबारात दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. त्यांना छातीत एक गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर त्यांनी उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या