18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeसोलापूरवादग्रस्त वक्तव्याने माजी आमदार राजन पाटील अडचणीत

वादग्रस्त वक्तव्याने माजी आमदार राजन पाटील अडचणीत

एकमत ऑनलाईन

सोलापूर : टाकळी सिंकदर(ता.मोहोळ) येथील भीमा साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान भीमा बचाव आघाडीचे पॅनल प्रमुख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी ‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच एवढी पोरंअसतात, याचा आम्हाला स्वाभिमान आहे’ असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

केलेल्या वक्तव्याने, अक्षरश: वातावरण ढवळून निघाले असून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने महिलांना अपमानीत झाल्याचा बोलबाला असून, याबद्दल महिला वर्गामधून प्रचंड रोष व्यक्त केला जात असल्याची चर्चा आहे. पाटील यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यासाठी चाचपणी सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे.

खास बाब म्हणजे पाटील यांच्या ‘बेताल’ वक्तव्यावरुन उभ्या महाराष्ट्रात चर्चेेचे मोहोळ उठले असून त्यांच्या जीभ घसरण्यावरुन वेगळाच वाद पेटला आहे. माजी आमदार पाटील हे अडचणीत आले आहेत.

भीमा साखर कारखान्याची निवडणूक उद्या रविारी होत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने, प्रचाराचे रणांगण भयावह तापले आहे. सत्ताधारी महाडिक गटाने विरोधी माजी आमदार राजन पाटील व प्रशांत परिचारक गटापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. महाडिक तसेच पाटील आणि परिचारक यांच्या राजकीय अस्त्विाची दिव्य परीक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने होत आहे. त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

दरम्यान काल शुक्रवारी निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या टाकळी सिंकदर येथील शेवटच्या सभेत माजी आमदार राजन पाटील यांची जीभ चांगलीच घसरली.‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच एवढी पोरं असतात, याचा आम्हाला स्वाभिमान आहे’ असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. विशेषत्वे, एवढ्यावरच ते थांबले नाहीत. ‘आमच्या पोरांना भिती दाखवता का? वयाच्या १७ व्या वर्षी ३०२ कलम भोगणारी आमची पोरे हायती’ असे वादग्रस्त विधान करून त्यांनी पोराच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे जणू समर्थनच केले.

माजी आमदार पाटील यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील पाटील मंडळींना बदनाम करण्याचा तर प्रकार झालाच, शिवाय महिला अपमानीत होतील, दुखावल्या जातील, याबरोबरच मुलाच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे असे अर्थ आता त्यांच्या वादग्रस्त विधानांशी लावले जात आहेत. तशी चर्चा सर्वत्र सुुरु आहे. पाटील यांच्या या वक्तव्याने दुसराच वाद पेटला असून राज्यभर त्याची चर्चा सुरु झाली आहे. पाटील यांची जीभ घसरल्याने त्यांची मोठी पंर्चाईत झाली आहे. ते अडचणीत आल्याचे मानले जात आहे.

पाटील यांच्या विधानावर खरपुस समाचार
माजी आमदार राजन पाटील यांनी जी अत्यंत वादग्रस्त विधाने केली, त्याचा खरपुस समाचार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटी यांना एका जाहीर सभेतून घेतला आहे. ‘लग्नाअधीच पोरं आहेत, असे म्हणणा-या, महिलांचा अपमान र्होईल, महाराष्ट्रातील समस्त पाटील मंडळींची बदनामी होईल, याशिवाय पोरांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभिमान आहे, अशी बेताल वक्तव्य करर्णा­या विकृत माणसाच्या हाती भीमा कारखान्याची सत्ता सोपविणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित करीत राजन पाटील यांना चांगलेच खिंडीत गाठल्याची चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या