16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeआंतरराष्ट्रीय1100 वर्षं जुनी अब्बासिद काळातील 425 सोन्याची नाणी मिळाली

1100 वर्षं जुनी अब्बासिद काळातील 425 सोन्याची नाणी मिळाली

एकमत ऑनलाईन

इस्रायल : अनेकदा जगात अशा गोष्टी सापडतात ज्यांनी माणूस विस्मयचकित होतो. असंच काहीसं इस्रायलमध्ये झालं आहे. इथे एका उत्खननादरम्यान अकराशे वर्षं जुना खजिना सापडला आहे.

इस्रायलमधील यवने नावाच्या शहराजवळ एका संरक्षित जमिनीत खोदकाम सुरू होतं. तेव्हा तिथे काम करणाऱ्या एका तरुणाला जमिनीच्या आत एक चकती दिसली. सोनसळी रंगाची ती चकती उचलल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ते एक नाणं आहे. तेव्हा तिथे अजून खोदकाम केल्यानंतर जवळपास 425 सोन्याची नाणी मिळाली. त्या नाण्यांवर इस्लामिक भाषेत काहीतरी मजकूर कोरण्यात आला आहे.

इस्रायलचे पुरातत्व संशोधक लियात नादाव जिव आणि एली हद्दाद यांनी संयुक्तरित्या दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व 425 नाणी संपू्र्ण सोन्याची आहेत. त्यातली बहुतांश नाणी जवळपास 1100 वर्षं जुनी अब्बासिद काळातील असावीत, असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. कुणीतरी ती नाणी अकराशे वर्षांपूर्वी जमिनीत गाडली होती. ही नाणी जिथे सापडली तिथे अब्बासिद काळात बाजारपेठ होती. त्यामुळे एखाद्या दुकानदाराने ती नाणी तिथे लपवून ठेवली असावीत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची तब्येत खालावली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या