27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeदेशात साडे चार कोटी दुकाने उघडली!

देशात साडे चार कोटी दुकाने उघडली!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीसह देशभरात सुमारे साडेचार कोटी दुकाने उघडल्याचा दावा अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) मंगळवारी केला. मात्र दुकाने उघडतानाच त्यांची योग्य प्रकारे साफसाफाई करण्याचे व ती दुकाने सॅनिटाइझ करण्याचे आवाहन संबंधित पालिकांनी केले होते. लॉकडाउनकाळातील ५५ दिवसांनंतर प्रथमच दुकानदार स्वत:चे दुकान उघडत होते.

कैटच्या म्हणण्यानुसार, बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी फार कमी कर्मचारी कामावर आले. शहरातील कामगार मोठ्या संख्येने गावी गेल्यामुळे कर्मचाºयांची संख्या रोडावली आहे. राजधानी दिल्लीत काम करणारे ७० टक्के कर्मचारी गावी गेल्यामुळे बाजारात शांतता होती. बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात व्यवसाय झाला नसल्याचे निरीक्षण कैटने नोंदवले आहे. ५५ दिवस दुकाने बंद असल्यामुळे अनेक दुकानांतील माल खराब झाला आहे. यामुळेही व्यापा-यांचे व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read More  धक्कादायक : बीड आणखी 8 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 20 वर

सर्वत्र धूळ, घाणीचे साम्राज्य
अनेक दिवसांनंतर दुकाने उघडल्यावर या दुकानांची साफसफाई करणे गरजेचे झाले आहे. या दुकानांतील अनेक मालावर बुरशी पसरली आहे. बंद राहिल्यामुळे अनेक खाद्यपदार्थ खराब झाले आहेत, अनेक पॅकबंद खाद्यपदार्थांची मुदत पूर्ण झाल्यामुळे तो सर्व माल फेकून द्यावा लागणार आहे. यातून अनेक विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची बीतीही अनेक दुकानदार व्यक्त करत आहेत. ही दुकाने संपूर्णत: स्वच्छ करण्यासाठी किमान एका आठवड्याचा कालावधी लसागणार आहे, याकडेही कैटने लक्ष वेधले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व व्यापा-यांना मास्क आणि ग्लोव्ह्ज घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सुरक्षित वावराचे नियम पाळण्यासही सांगण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत सम-विषम व्यवस्थेनुसार पाच लाख दुकाने उघडली आहेत. कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, दिल्लीतील सम-विषम व्यवस्थेला सर्वच व्यापा-यांनी विरोध केला आहे. या पद्धतीमुळे संपूर्ण दुकाने उघडण्यावर मर्यादा येणार आहेत. कॅटने उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून ही व्यवस्था बदलण्याची विनंती केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या