28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeक्रीडाआरसीबीच्या पराभवाचा चौकार

आरसीबीच्या पराभवाचा चौकार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महिला आयपीएल स्पर्धेत आरसीबीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. आज झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्स संघाने आरसीबीचा दहा विकेट्सने पराभव केला. आरसीबीचा हा सलग चौथा पराभव ठरला. या स्पर्धेत आरीसीबीला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १३८ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल यूपी संघाने १३ षटकात हे आव्हान सहज पार केले. यूपीची कर्णधार अ‍ॅलिसा हेली हिने विस्फोटक फलंदाजी केली. हेलीने नाबाद ९६ धावांची खेळी केली, तर देविका वैद्य हिने नाबाद २६ धावांचे योगदान दिले. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण युपीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला.

सलामी फलंदाज आणि कर्णधार स्मृती मंधाना अवघ्या चार धावा काढून माघारी परतली. सोफी डिवाइन आणि एलिसा पेरी यांनी आरसीबीचा डाव सावरला. एलिसा पेरी हिने ५२ धावांची खेळी केली, तर सोफी डिवाइन हिने ३६ धावांचे योगदान दिले. पण त्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. आरसीबीने ठराविक अंतराने विकेट फेकल्या. कनिका आहुजा ८, हेथर नाईट २, श्रेयंका पाटील १५, एरीन बर्न्स १२ आणि ऋचा घोष १ यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. परिणामी आरसीबीचा संघ २० षटकेही फलंदाजी करू शकला नाही. १९.३ षटकात आरसीबीच्या संघाने सर्वबाद १३८ धावांपर्यंत मजल मारली.

युपीकडून सोफी एक्लेस्टोन हिने भेदक मारा केली. सोफी एक्लेस्टोन हिने ३.३ षटकात १३ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेतल्या, तर दीप्ती शर्माने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. त्याशिवाय राजेश्वरी गायकवाड हिला एक विकेट मिळाली.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या