छ. संभाजीनगर जिल्ह्यातील घटना, गावावर शोककळा
छ. संभाजीनगर : जिल्ह्यात गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील कायगाव टोका येथे असलेल्या गोदावरी नदीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलांचा शोध सुरु केला. तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र यात चौघांचाही मृत्यू झाला. बाबासाहेब गोरे, नागेश गोरे, आकाश गोरे, शंकर घोडके असे चारही मुलांची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रोडवरील कायगाव टोका प्रवरासंगमच्या गोदावरी नदीत चार जण बुडाले. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील हे तरुण होते. चारही तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. दरम्यान यात्रेहून परत येत असताना गोदावरी नदीत आंघोळीसाठी उतरले होते. सुरुवातीला दोन जण बुडाले, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेले आणखी दोघेही पाण्यात बुडाले. दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात येताच पोलिसांना माहिती दिली. तसेच परिसरातील नागरिकांनीदेखील घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ज्यात चार तासांनी चारही मुलांना बाहेर काढण्यात यश आले. पण चौघांचाही या घटनेत मृत्यू झाला.
पालखेड गावावर शोककळा
कायगाव येथील गोदावरी नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. हे चारही तरुण वैजापूर तालुक्यातील पालखेड गावातील होते. या घटनेत चारही जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पालखेड गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.