24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसय्यद सलाउद्दीनचा मुलगा, बिट्टा कराटेची पत्नीसह चौघांना नोकरीहून हटवले

सय्यद सलाउद्दीनचा मुलगा, बिट्टा कराटेची पत्नीसह चौघांना नोकरीहून हटवले

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीर प्रशासनाने बिट्टा कराटे यांच्या पत्नीसह दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या चार सरकारी कर्मचा-यांवर मोठी कारवाई केली आहे. बिट्टा कराटे यांची पत्नी जम्मू-काश्मीरच्या प्रशासकीय सेवेत होती. तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर सईद सलाहुद्दीनच्या तिस-या मुलावरही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारने दहशतवादी बिट्टा कराटेच्या पत्नीसह चार सरकारी कर्मचा-यांना बडतर्फ केले आहे. या चारही कर्मचा-यांना घटनेच्या कलम ३११ अन्वये सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, हे कलम वापरून सरकार अधिक कोणतीही चौकशी न करता त्यांच्या कर्मचा-यांना बडतर्फ करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिट्टा कराटे यांची पत्नी आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील अधिकारी इस्बा अर्जुमंद खान यांना जम्मू-काश्मीर सरकारने एलजी मनोज सिन्हा यांच्या सूचनेवरून बडतर्फ केले आहे.

त्या २०११ च्या बॅचच्या ङअर अधिकारी आणि ग्रामीण विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी होत्या. यासोबतच काश्मीर विद्यापीठातील एका शास्त्रज्ञ आणि सहायक प्राध्यापकाचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. जेकेईडीआयमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या अब्दुल मुईदलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अब्दुल मुईद हा बंदी असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा आहे. त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या