22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeसोलापूरपंढरपुरात चार जणांना रेल्वेची धडक, तिघांचा मृत्यू तर एक जखमी

पंढरपुरात चार जणांना रेल्वेची धडक, तिघांचा मृत्यू तर एक जखमी

एकमत ऑनलाईन

पंढरपूरःपंढरपूरमध्ये रेल्वेने चार जणांना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एका गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहाराचे सांगण्यात आले आहे. बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी पहाटे ही दुर्घटना घडली आहे.

पंढरपूरमध्ये रेल्वेने चार जणांना धडक दिली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे.

बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी पहाटे ही दुर्घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पोलि‍सांनी जखमी अवस्थेत दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेल्वे रुळावर दारूच्या बाटल्याही आढळल्या आहेत. त्यामुळे हे मजूर दारू पित बसले असताना हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. तर मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही.
मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या