24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयचारचाकी, दुचाकी वाहने महागणार

चारचाकी, दुचाकी वाहने महागणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमियममध्ये वाढ होणार असल्यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. भारतीय बाजारपेठेत ही वाढ १ जूनपासून लागू होणार आहे. आता थर्ड पार्टी इन्शुरन्स महागणार असल्याने चारचाकी गाड्यांच्या किमतीही वाढणार आहेत. याचा फटका वाहन खरेदी करणा-या ग्राहकांना बसणार आहे. अर्थात, आधीच महागाईने होरपळलेल्या लोकांना यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

विशेष म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास महामंडळाऐवजी (आयआरडीआय) मंत्रालयाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले. आयआरडीआय ही देशातील विमासंदर्भातील नियमनाचे काम करते. या नव्या नियमामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे वाहन खरेदीच्या स्वप्नापर्यंतचा प्रवास अधिक खडतर होणार आहे. थर्ड पार्टी विम्यात वाढ झाल्याने देशातील वाहनांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे.

दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्याकिंमती या निर्णयामुळे वाढणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा अधिक खाली होणार आहे. सध्या भारतीय वाहन उद्योगासमोर अगोदरच मायक्रोचीपचा तुटवडा आणि कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याचे अनेक प्रश्न उभे असतानाच या निर्णयामुळे वाहनखरेदी करणा-या ग्राहकसंख्येवर परिणाम होण्याची भीती वाहन उद्योजकांना आहे.

खासगी गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास १००० ते १५०० सीसी क्षमतेचे इंजिन असणा-या गाड्यांच्या थर्ड पार्टी प्रिमयममध्ये ६ टक्क्यांनी वाढ होणार आहे. आधीच गाड्यांच्या किमती वाहननिर्मिती कंपन्यांनी वाढवल्याने त्या महाग झाल्या आहेत. त्यात आता या अतिरिक्त ६ टक्क्यांचा भार थेट ग्राहकांवर पडणार आहे. १००० सीसी इंजिन असणा-या नवीन गाड्यांसाठी थर्ड पार्टी विम्याची रक्कम २३ टक्क्यांनी वाढणार आहे, तर १००० ते १५०० सीसी क्षमतेच्या इंजिनच्या गाड्यांवरील प्रीमियममध्ये ११ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

दुचाकीच्या विम्यात १५ टक्के वाढ होणार
मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार प्रीमियम मोटारसायकलच्या विम्यामध्ये १५ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. मात्र, ही वाढ १५० सीसीपेक्षा अधिक इंजिन क्षमता असणा-या गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बजाज पल्सर, केटीएम आरसी ३९०, रॉयल एनफिल्ड बुलेट आणि याच क्षमतेच्या गाड्यांचा समावेश असणार आहे.

दुचाकी खरेदीसाठी १७ टक्के बोजा वाढणार
वाहनांच्या किमती वाढणे किंवा प्रीमियम वाढणे ही मध्यम वर्गीयांसाठी चिंतेची बाब आहे. कारण थर्ड पार्टी इन्शुरन्स महागल्याने गाड्यांच्या किमती वाढणार आहेत. याचा परिणाम म्हणून भारतात यापुढे कोणत्याही राज्यात दुचाकी घ्यायची असेल, तर १७ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. आधीच वाहननिर्मिती कंपन्यांनी दरवाढ केली असून त्यात आता या नवीन नियमामुळे वाहने अधिक महाग होणार आहेत.

या वर्षीच्या सुरुवातीलाच वाढल्या होत्या किमती
या वर्षाच्या सुरुवातीलाच मारुती सुझुकी, टोयोटा, महेंद्रा, टाटा या कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमतींमध्ये वाढ केली. कच्च्या मालाचा पुरवठ्याला कोरोनामुळे फटका बसल्याने गाड्यांच्या किमती वाढवण्यात आल्या. याचदरम्यान दुचाकी बाजारातील वाहननिर्मिती कंपन्यांनीही गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत.

कितीने वाढणार विमा
प्रीमियम दुचाकी (१५० सीसीवरील क्षमता) : १५ टक्के वाढ
कार (१००० ते १५०० सीसी क्षमता) : ६ टक्क्यांनी वाढ
कार (१००० सीसीपर्यंत क्षमता असणा-या) झ्र २३ टक्क्यांनी वाढ
स्कुटर्स आणि मोटरसायकल (१५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या) झ्र १७ टक्क्यांनी वाढ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या