27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रलॉकडाऊन ४.० : राज्यात आता केवळ २ झोन!

लॉकडाऊन ४.० : राज्यात आता केवळ २ झोन!

एकमत ऑनलाईन

लॉकडाऊन ४.० नवी नियमावली जाहीर, २२ मेपासून होणार लागू , दुकाने, सलून सुरू होणार, जिल्हांतर्गत प्रवासाची मुभा

मुंबई (प्रतिनिधी)
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ३१ मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने आज चौथ्या टप्प्याची नियमावली जाहीर केली. राज्यात या पुढे रेड व नॉन रेड असे दोनच झोन राहणार असून रेड झोनमधील निर्बंध कायम ठेवताना उर्वरित राज्यातील निर्बंध सरकारने सैल केले आहेत. जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याची तसेच सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत दुकाने आणि बाजारपेठा, सलून सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यात व विशेषत: शहरी भागात वाढतच असल्याने लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर चौथ्या टप्प्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. २२तारखेपासून ही नियमावली अंमलात येणार आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येनुसार पूर्वी ग्रीन, आॅरेंज व रेड असे तीन झोन करण्यात आले होते. यापुढे रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन असे झोन असतील. कंटेनमेन्ट व रेड झोनमध्ये पूर्वीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तसेच स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयांमुळे होणारा गोंधळ विचारात घेऊन, कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन स्थानिक प्रशासनावर घालण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात संपूर्ण राज्यात पूर्वीप्रमाणे ट्रेन, मेट्रो, विमान सेवा बंद राहणार आहे. याशिवाय आंतरराज्य रस्ते वाहतूक, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे बंद राहतील. याशिवाय संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत सर्व सेवा बंद राहणार असून पूर्वी असलेले निर्बंध कायम असतील.

मुंबईसह विविध महापालिका रेड झोनमध्ये !
नवीन रचना करताना मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील ( एमएमआर) सर्व महापालिका, तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिकांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तेथील सध्याचे निर्बंध कायम राहतील. तर कंटेन्मेंमट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील

रेड झोनमध्ये मात्र अत्यावश्यक सेवेबरोबरच
इतर दुकानांना परवानगी देण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल, स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकाने सुरू करता येतील दारूची होम डिलिव्हरी करता येईल. रेड झोनमधील टॅक्सी, रिक्षा सेवा यापुढेही बंद राहणार असून खाजगी चार चाकी वाहनांमध्ये १+ २ असे तिघांना, तर दुचाकीवर एकालाच प्रवास करण्याची परवानगी असेल. मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू ठेवता येतील. या भागातील दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

रात्रीची संचारबंदी
संध्याकाळी ७ ते सकाळी ७ सर्व सेवा बंद राहणार. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बाहेर पडायला मज्जाव. ६५ वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती,  १० वर्षांखालील मुले यांनी घरीच थांबावे, वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडावे़राज्याची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी. रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका.

उरलेले क्षेत्र बिगर रेड झोन क्षेत्र
कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी. कंटेन्मेंमट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होणार.

काय बंद राहणार?
ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार. आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार.शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार.

नॉन रेड झोनमध्ये अधिक सवलत !
नॉन रेड झोनमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेने जिल्हांतर्गत बस सेवा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे तसेच सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते. स्पोर्टस कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार; पण सामूहिक जमावाला बंदी असेल.

बिगर रेड झोनमधील सलून सुरू करण्यास परवानगी
नव्या नियामावलीत बिगर रेड झोनमधील सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दाढी-केस कापण्यासाठी वाट पाहणाºयांना दिलासा मिळणार आहे. मात्र सलूनमध्ये मास्क, हँड सॅनिटायझरबाबतचे नियम आणि कोरोना संदर्भातील अटी-शर्तींचे पालन करणे सलून चालकांना बंधनकारक असणार आहे.

राज्याची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी

​काय सुरु राहणार

 • मालवाहतुकीला सर्वत्र परवानगी.
 • अत्यावश्यक दुकानांना सर्वत्र परवानगी.
 • दारु दुकाने (रेड झोनमध्ये होम डिलिव्हरीला परवानगी) मात्र कंटेनमेंट झोनमध्ये बंद राहणार, अन्य झोनमध्ये सुरु राहणार.
 • वैद्यकीय दवाखाने कंटेनमेंट झोन वगळता सर्वत्र सुरु राहणार.
 • कंटेनमेंट झोन वगळता हॉटेलमधून होम डिलिव्हरीला परवानगी.
 • कंटेनमेंट झोन वगळता आरटीओ कार्यालये सुरु राहणार.
 • ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये टॅक्सीमध्ये चालकासह दोघांना परवानगी.चार चाकीमध्ये 1+ 2 आणि दुचाकीवर एकालाच परवानगी
 • ई-कॉमर्स सेवांना कंटेनमेंट झोन वगळता परवानगी.
 • कंटेनमेंट झोन वगळता बँका, वित्तीय सेवा सुरु राहणार.
 • कंटेनमेंट झोन वगळता कुरियर पोस्टल सेवा सुरु राहणार.
 • अन्य झोनमध्ये खासगी बांधकाम साइटसला परवानगी.
 • रेड झोनमध्ये शहरी भागात एकल दुकानांना मर्यादीत परवानगी.

​काय बंद राहणार

 • संध्याकाळी 7 ते सकाळी 7 सर्व सेवा बंद राहणार
 • अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बाहेर पडायला मज्जाव
 • 65 वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती, 10 वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावे, वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडावे
 • डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार.
 • ट्रेन, मेट्रो सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार.
 • आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार.
 • रेड झोनमध्ये शेती कामांना परवानगी नाही.
 • सलून, स्पा सर्वच झोनमध्ये बंदच राहणार.
 • सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
 • टॅक्सी, रिक्षा रेड झोनमध्ये परवानगी नाही.
 • रेड झोनमध्ये खासगी बांधकाम साईटसना परवानगी नाही.
 • रेड झोनमध्ये खासगी कार्यालयांना परवानगी नाही.
 • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
 • रेड झोनमध्ये चार चाकी, दोन चाकी वाहनांना अत्यावश्यक असेल तरच परवानगी.
 • सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार

Lockdown 4

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या