अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येत श्री राम जन्मभूमी परिसरात जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. याच दरम्यान राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला अनेक पुरातत्व शिल्प आढळली आहेत. यामध्ये अनेक मूर्त्या, खांब आणि शिवलिंगाचा समावेश आहे. यामध्ये अनेक देवी देवतांच्या खंडित मूर्त्या, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, सात ब्लॅक टच स्तंभ आणि सहा लाल वाळूच्या दगडांचे स्तंभ तसेच, ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग आहे.
मलबा हटवण्याचे आणि समतोलीकरणाचे काम सुरू असताना चार फुटांचे एक शिवलिंग या ठिकाणी आढळले. यावर बोलताना हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी हे सगळ्या आरोपांचे उत्तर असल्याचे म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना मुस्लीम पक्षाने आमच्यावर हिंदू तालिबाचा आरोप केला होता. तसेच, या ठिकाणी कोणत्याही मंदिराचे अवशेष सापडले नसल्याचे म्हटले होते. या पुरातन मूर्त्या त्यांच्या आरोपांना उत्तर आहेत, असे हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी म्हटले आहे.
Read More चीन अफवा पसरवतो-डोनाल्ड ट्रम्प
राम जन्मभूमी परसरात अनेक मंदिरांचे अवशेष असल्याचे आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोरही म्हटले होते़ याआधाही, खोदकाम सुरू असताना एएसआयला एक शिवलिंग आढळले होते़ एएसआयच्या अहवालातही या परिसरात मंदिरांचे अनेक अवशेष असल्याचे म्हटले आहे़ बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिराची मोठी रचना होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले म्हणणे किती खरे होते, हे आज मिळालेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत आहे़, असेही स्पष्टीकरण जैन यांनी दिले आहे़