बेंगळुरू : बेंगळुरूजवळील चिक्कबल्लापूर येथील श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च या कॉलेज मध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. प्रवेश घेण्यासाठी कोणतीही फी या महाविद्यालयात आकारण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेद्वारे देण्यात येईल.
एमबीबीएस चा संपूर्ण कोर्से विनामूल्य केला केला गेला आहे आणि सोबतच या महाविद्यालयात राहण्याची आणि भोजनाची व्यवस्थाही मोफत असेल. या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना सद्गुरू श्री मधुसूदन साई यांनी केली आहे.
खासगी वैद्यकीय महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासाठी ८० लाख ते १.१५ कोटी रुपये शुल्क आकारतात. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी या महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे.
श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे रुग्णालय देखील आहे. तिथे की प्रचंड गर्दी असते. येथे रुग्णावर विनामूल्य उपचार केला जातो. या रुग्णालयात कुठेही कॅश काउंटर नाही. येथे प्रत्येकासाठी सर्व काही विनामूल्य आहे.