35.2 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeराष्ट्रीय७० लाख विद्यार्थ्यांना रोज मोफत दूध

७० लाख विद्यार्थ्यांना रोज मोफत दूध

एकमत ऑनलाईन

जयपूर : राजस्थान सरकारने सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बाल गोपाल योजनेंतर्गत, नवीन शैक्षणिक सत्रापासून दररोज मोफत दूध दिले जाणार आहे. याअगोदर सरकारच्या वतीने आठवड्यातुन दोन दिवस मोफत दुध दिले जात होते. आता याचा प्रभाव लक्षात येताच सरकारने दररोज मोफत दूध देण्याचा निर्णय घेतला आहे. ७० लाखांहून अधिक विद्यार्थी या योजनेचा फायदा होईल.

राजस्थान सरकारचे म्हणणे आहे की, या योजनेमुळे कोणताही विद्यार्थी शाळेत जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागेल व त्याला शाळेची आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवार या शैक्षणिक दिवसांत आठवड्यातील ६ दिवस मोफत दूध दिले जाईल. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ४७६.४४ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ती वाढवून मंगळवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या योजनेसाठी ८६४ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे.

राजस्थान शालेय शिक्षण परिषदेचे आयुक्त मोहनलाल यादव यांनी माध्यमांना माहिती दिली की, सरकारी शाळांमध्ये बाल गोपाल योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांना १५० मिली आणि इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांना २०० मिली पावडरने बनलेले दूध प्रार्थनेनंतर दिले जाईल. याअंतर्गत राजस्थान को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशनच्या मदतीने शाळांमध्ये दूध पोहोचवले जाणार आहे. या योजनेत दूध वितरणाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल. दुधाची गुणवत्ता फेडरेशन आणि एसएमसी (शाळा व्यवस्थापन समिती) द्वारे तपासली जाईल.

मोफत शालेय गणवेश

यासोबतच सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना मोफत शालेय गणवेश देण्याची तयारीही सरकारने सुरू केली आहे. अशा परिस्थितीत यावेळी सरकार विद्यार्थ्यांना गणवेशासह शिवणकामाचेही पैसे देऊ शकते, असे मानले जात आहे.

दररोज वेगवेगळा आहार

मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांमध्ये दररोज मेनूनुसार जेवण दिले जाते. सोमवारी भाजी-पोळी, मंगळवारी डाळ-भात, बुधवारी डाळ-पोळी, गुरूवारी नमकीन तांदूळ किंवा भाजीयुक्त खिचडी, शुक्रवारी डाळ-पोळी, शनिवारी भाजी-पोळी दिली जाते. याशिवाय विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा हंगामी फळेही दिली जातात.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या