22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रअंबानींकडून महाराष्ट्राला विनाशुल्क ऑक्सिजनचा पुरवठा

अंबानींकडून महाराष्ट्राला विनाशुल्क ऑक्सिजनचा पुरवठा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. राज्यात रेमडेसिवीरचा तसेच, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्राकडे मदतही मागितली आहे. दरम्यान राज्याच्या मदतीसाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे.

जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणा-या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे कंपनीच्या एका कर्मचा-याने सांगितले असल्याचे वृत्त आहे़ कंपनीच्या नियमांमुळे त्यांनी आपले नाव जाहीर केलेले नाही.

एकनाथ शिंदे यांचा दुजोरा
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ट्विट करत या माहितीला दुजोरा दिला आहे. रिलायन्सच्या जामनगर प्लँटमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल, अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

देशात २४ तासांत २१७३५३ नवे रुग्ण; ११८५ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या