24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयअभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पंतप्रधानांना शिवीगाळ नव्हे!

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पंतप्रधानांना शिवीगाळ नव्हे!

एकमत ऑनलाईन

लखनौ : मुलभूत अधिकारांमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मर्यादा याकडे लक्ष वेधून घेताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतीच एक महत्वाची टिपण्णी केली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पंतप्रधानांना शिवीगाळ करणे नव्हे असे म्हटले आहे. तसेच वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे अटकेची कारवाई झालेल्या आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला. न्या. अश्वनी कुमार मिश्रा आणि राजेंद्र कुमार यांच्या खडंपीठाने ही टिपण्णी केली आहे.

मुमताज मन्सुरी नामक एका व्यक्तीने अलाहाबाद हायकोर्टात आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. हा गुन्हा फेसबूकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या लोकांना लागू होत नाही, जे इतर नागरिकांविरोधात शिवीगाळ करतात. विशेषत: महत्वाची व्यक्ती पंतप्रधान किंवा इतर कोणी केंद्रीय मंत्री असतील.

दरम्यान, आरोपीला अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक स्टेट्स ठेवल्याबद्दल अटक झाली होती. त्याने पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांना कुत्रा असे संबोधले होते. या बद्दल आरोपीवर भादंविमधील विविध कलमांसह कलम ५०४ आणि कलम ६७ आयटीअ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हायकोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं की, एफआयआरमध्ये दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपीवरील गुन्हा रद्द करणे हे योग्य संदेश ठरणार नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काय, किती आणि कुणासाठी?
राज्यघटनेने स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. कलम १९ मध्ये अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यांचा उल्लेख आहे. यातला पहिलाच भाग, म्हणजे कलम १९-१(अ) मध्ये भारताच्या सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. पण हे अमर्याद आहे का? अर्थातच नाही!

कलम १९ महत्वाचे
कलम १९ च्या दुस-या भागात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची बंधने सांगितली आहेत. अशा काही गोष्टी आहेत. ज्यांना तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे बाधा होऊ शकत नाही किंवा तुमच्या स्वातंत्र्यामुळे काही गोष्टी घडत असतील तर त्यासाठी तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

समाविष्ट बाबी
भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व
राष्ट्रीय सुरक्षा
परकीय देशांबरोबरचे संबंध
सार्वजनिक व्यवस्था
नीतिमत्ता
न्यायालयाचा अवमान
अब्रूनुकसानी किंवा गुन्हा करण्यासाठी चिथावणी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या