24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Home१ जून पासून दररोज 2०० विशेष रेल्वे गाड्या-पीयूष गोयल

१ जून पासून दररोज 2०० विशेष रेल्वे गाड्या-पीयूष गोयल

एकमत ऑनलाईन

दिलासादायक : लॉकडाऊन ४.० मध्ये सरकारचा सर्वाच मोठा निर्णय

नवी दिल्ली :देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांसाठी श्रमिक स्पेशल आणि श्रीमंतांसाठी राजधानी स्पेशल सुरू केल्यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. १ जून पासून दररोज २०० विशेष रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसारच सोडल्या जाणार असल्याचे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

Read More  रेडझोनमधून आलेल्यांना क्वारंन्टाईन करून सुविधा द्याव्यात

गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद ठेवली आहे. रेल्वे सुरू झाल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने प्रवासी वाहतूक इतक्या मोठ्या काळासाठी बंद ठेवली आहे. मात्र, आता अखेर ती प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू होणार असून रेल्वेमंत्र्यांनीच ट्वीटवरून ही घोषणा केली आहे. येत्या १ जूनपासून देशात नॉन एसी रेल्वे सुरू होणार असून त्याची ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. देशभरात रोज २०० रेल्वे धावणार आहेत. मात्र, त्याचे बुकिंग नेमके कधीपासून सुरू होणार, याविषयी मात्र रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिलीली नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या