मुंबई : शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्रिपदाचा त्याग करत असल्याची घोषणा केली. राज्यात अडीच वर्षे सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले.
या सर्व घडामोडींमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे. राज ठाकरेंचे हे ट्विट उद्धव ठाकरे यांना उद्देशून असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज ठाकरेंनी एक ट्विट केले आहे की, ‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तव्य समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा -हासाकडे प्रवास सुरू होतो.’ सत्तांतरानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला असून ट्विटरच्या माध्यमातून राज यांनी उद्धव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
……..