22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयफरार मल्ल्या-नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करणार

फरार मल्ल्या-नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फरारी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना भारताच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती दिली. मल्ल्या आणि नीरव यांच्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मला या दोघांनाही भारताच्या स्वाधीन करायचे आहे. कारण कायदा चुकवून जे लोक आपल्या देशात येतात, त्यांचे स्वागत आम्हाला कधीच करायचे नाही असे त्यांनी नमूद केले आहे.

जॉन्सन पुढे म्हणाले, तुम्ही ज्या दोन व्यक्तींबद्दल बोलत आहात, आम्हाला त्यांना भारतात परत पाठवायचे आहे. पण काही कायदेशीर बाबी आहेत. त्यामुळे कायदा चुकवून जे लोक आपल्या देशात येतात त्यांचे स्वागत आम्हाला कधीच करायचे नाही. आम्ही त्या दोघांवर योग्य ती कारवाई करू असेही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या