22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeअन्नसुरक्षेसाठी ‘जी-७’चा पुढाकार

अन्नसुरक्षेसाठी ‘जी-७’चा पुढाकार

एकमत ऑनलाईन

म्युनिक : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात आली असतानाच ‘जी-७’ या गटात सहभागी असलेल्या श्रीमंत देशांनी हे संकट दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

या आपत्तीच्या निवारणासाठी ४.५ अब्ज डॉलर एवढा निधी खर्च केला जाणार आहे. या युद्धामुळे जगातील अन्नधान्याचे संकट अधिक गहिरे झाले असून त्यांच्या किमतीही गगनाला भिडू लागल्या आहेत. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ‘‘अमेरिका यासाठी २.६७ अब्ज डॉलरचा निधी राखून ठेवणार आहे.

जगातील ४७ देशांना या माध्यमातून मदत केली जाणार असून काही प्रादेशिक संघटनांना देखील हा निधी देण्यात येईल. युद्धामुळे निर्माण झालेली अन्न असुरक्षा आणि कुपोषण या समस्यांचा त्याद्वारे सामना करण्यात येईल.’’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या